संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा; चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : संजय राऊत जे बोलतात त्यांना उद्धव ठाकरे यांची मान्यता असते. ते सामनामधून जे लिहितात त्याला त्यांची मान्यता असते. आमदारांना चोर म्हणणे यास उद्धव ठाकरे सहमत नसतील तर त्यांनी राऊत यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना बावनकुळे म्हणाले, बाकी वेळेस पत्रकार परिषद घ्यायला ठाकरे तत्पर असतात. आज ते का बोलले नाही. हक्कभंग समिती जी काही कारवाई करायची आहे ती करणारच आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी.निदान फेसबुक लाइव्ह करून तरी भूमिका स्पष्ट करावी. आदित्य ठाकरे यांनी समोर येऊन बोलावे. १२ कोटी जनतेच्या मतांचा अपमान राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे. ते कारागृहात राहून आले आहेत.त्यामुळे त्यांना माफी मागण्याची सवय नाही. विधिमंडळात ठाकरे गट नाही. एकच गट आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत मान्यता दिली असल्याने ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात आले. धैर्यशील मानेंसारखा चांगला नेता आमच्याकडे आला.याचा भाजपला फायदा होईल. येणाऱ्या काळात मोठी इनकमिंग भाजपमध्ये होणार आहे. कसबा, चिंचवड दोन्ही जागा आम्ही जिंकू. ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर पक्षाने तिथे काम केले आहे. एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका. कसबामध्ये भाजपच निवडून येईल, असाही दावा बावनकुळे यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने