अमित शाहांनी घेतली Ram Charan आणि चिरंजीवीची भेट..पोस्ट करत म्हणाले, 'तेलगू चित्रपट उद्योग..'

दिल्ली: आरआरआरमधील नाटू नाटू ऑस्करमध्ये चांगलाच गाजला होता. या गाण्याने केवळ ऑस्कर जिंकला नाही तर जगभरात धुमाकूळ घातला. नुकतीच RRR टीम ऑस्कर ट्रॉफीसह भारतात परतली आहे .चित्रपटाच्या टीम एसएस राजामौल, एमएम कीरावानी, ज्युनियर एमटीआर आणि राम चरण यांनी विमानतळावर जंगी स्वागतही करण्यात आलं होतं. RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वच भारतीय याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.आरआरआरच्या टिमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच चित्रपटाचा लीड स्टार राम चरण आणि त्याचे वडील तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी हे शुक्रवारी दिल्लीत उपस्थित होते.यादरम्यान राम चरण आणि चिरंजीवी यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो दोन्ही कलाकरांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहेत. एवढेच नाही तर खुद्द अमित शाह यांनीही त्यांच्या ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहे. राम चरण अमित शाह यांना फुलांचा गुच्छ देत असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. एका फोटोत चिरंजीवी आणि राम दोघेही गृहमंत्र्यांसोबत बसलेले दिसत आहेत.

अमित शाह यांनी हे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले की, भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज चिरंजीवी आणि राम चरण यांना भेटून आनंद झाला. तेलगू चित्रपट उद्योगाचा भारताच्या संस्कृतीवर आणि अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला आहे. नाटू-नाटू गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्याबद्दल आणि 'RRR' च्या उत्तुंग यशाबद्दल राम चरणचे अभिनंदन."अमित शाह यांच्या ट्विटला उत्तर देताना राम चरण यांनी लिहिले की, आपले माननीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे.तर मेगास्टार चिरंजीवी यांनीही री-ट्विट केले आणि लिहिले, राम चरणला तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी श्री अमित शाह जी धन्यवाद. चिरंजीवीनेही RRR च्या संपूर्ण टीमच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

राम चरणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, राम चरण RC 15 चे शूटिंग करत आहे. यात अभिनेता दोन वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.या चित्रपटात कियारा अडवाणी देखील आहे. 'विनय विद्या रामा'नंतर तिचा रामसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. RC 15 मध्ये अंजली, जयराम आणि नस्सर यांचा समावेश आहे. याशिवाय रामचा बुची बाबू सनासोबत एका चित्रपटही आहे. तो नार्थनसोबतही एक चित्रपटही करणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने