तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस! कार्यकर्त्यांनी उंट दिला भेट; थेट सभागृहात...

तामिळनाडू: वाढदिवस म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक. वर्षातील हा दिवस स्पेशल असतो. अनेकजण वाढदिवसासाठी भेटवस्तू देत असतात तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क उंट भेट दिला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाचे ते नेते असून १ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असतो. तर काल त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट उंटाला घेऊनच सभागृहात प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी दिलेले गिफ्ट पाहून स्टॅलीन यांनासुद्धा हसू आवरलं नाही.



स्टॅलीन यांचा काल ७० वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी दोन वर्षांचा उंट चेन्नई येथील पक्षाच्या मुख्यालयात सादर केला.दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने