निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; आधार कार्डधारकांना दिलासा

दिल्ली:  निवडणुकीआधीच मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधार कार्डधारकांना दिलासा मिळाला आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना मोदी सरकारने निर्णयाचा धडाका लावला आहे. आधार कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी काम असो की खासगी काम असो. किंवा ओळखपत्र म्हणून सुद्धा आधार कार्ड महत्त्वाचे आहे. मुला मुलीच्या जन्मानंतर लगेच आधार कार्ड काढले जात आहेत.परंतु, तुम्ही आधार कार्ड काढून १० वर्ष पूर्ण झाली असतील तर त्याला अपडेट् करणे गरजेचे आहे. त्यासाठी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. मात्र, मोदी सरकारने आता आधार अपडेट करणे फ्री केले आहे.आता यापुढे ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करणाऱ्या यूजर्सला आता फुकटात हे अपडेट करता येवू शकणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे.

पुढील तीन महिन्यांपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट करणाऱ्याला आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याआधी यासाठी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. परंतु, आता आधार कार्ड अपडेट फ्री मध्ये होणार आहे.ऑफलाइन किंवा केंद्रावर जावून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आता १५ मार्च २०२३ पासून १४ जून २०२३ पर्यंत हे फ्रीमध्ये करता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने