दीपिकाच्या मानेवरच्या टॅटूचा अर्थ काय?

मुंबई: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका यंदाच्या ऑस्करमध्ये सहभागी झाली होती. तिनं अॅवॉर्डमध्ये प्रेझेंटेशन केले होते. दीपिकाला मिळालेला हा बहुमान तिच्या चाहत्यांसाठी मोठी गोष्ट होती. दीपिकानं तर ऑस्करसोहळ्याला पोहचण्यापूर्वी वर्कआऊट केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पहिल्यांदाच एखाद्या बॉलीवूडच्या सेलिब्रेटीला मिळालेला हा बहुमान दीपिकाच्या चाहत्यांना सुखावणारा आहे.यासगळ्यात दीपिकाच्या लक्षवेधी वेशभूषेची चर्चा रंगली होती. दीपिकानं परिधान केलेल्या त्या कॉस्च्युमनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले. तर मानेवरील टॅटूनं अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. तिला प्रतिक्रिया देताना त्या टॅटूचा अर्थ काय असा प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारला आहे. ऑस्करच्या रेड कार्पेटवर जगभरातील दिग्गजांनी गर्दी केली होती. त्यात भारताच्या सेलिब्रेटींचाही समावेश होता. त्यात सर्वाधिक चर्चा होती ती दीपिका आणि तिच्या वेषभूषेची.९५ व्या ऑस्कर सोहळ्यात दीपिकाच्या फोटो आणि व्हिडिओनं नेटकऱ्यांना जिंकून घेतले आहे. एरवी दीपिकाच्या फोटोला मिळणारा प्रतिसाद हा मोठाच असतो. मात्र ऑस्करच्या सोहळ्यात दीपिका झळकल्यानंतर तिच्या वाट्याला आलेली लोकप्रियता चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. दीपिकानं ब्लॅक रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यातही तिचा तो शोल्डर गाऊन चाहत्यांना घायाळ करणारा होता.दीपिकानं तिचा तो लूक इंस्टावर शेयर करताच त्यावल लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. तिनं लक्झरी ब्रँड लुईस व्हुटनमधून तो ड्रेस घेतला असून ती त्या जगप्रसिद्ध ब्रँडची अॅम्बेसिडर आहे. ती त्या ब्रँडचे प्रमोशन करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र जेव्हा चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष दीपिकाच्या टॅटूवर गेले तेव्हा चर्चा सुरुवात झाली.दीपिकाच्या मानेवर असणारा तो टॅटू काही साधासुधा नाही. तो एका ब्युटी ब्रँडशी संबंधितआहे. दीपिकाच्या मानेवर 82°E असे लिहिले आहे. त्यानं सगळयांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाकी काही का असेना यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात मात्र दीपिकाच्या लूक्सनं हॉलीवूडच्या सेलिब्रेटींना देखील तिच्या सौंदर्याची भुरळ पडल्याचे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने