निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

दिल्ली:  निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणुक आयुक्तांच्या निवडीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आयुक्तांच्या निवडीसाठी समिती नेमणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टाने दिली आहे.पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि CJI यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.आता निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सरन्यायाधीश यांची समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार आहे. सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते.




न्यायमूर्ती केएम जोसेफ नेमकं काय म्हणाले?

लोकशाही टिकण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची स्पष्टता राखली पाहिजे. अन्यथा कोणताही परिणाम होणार नाही. एक समिती मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करेल. या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI असतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने