'स्टुडन्ट ऑफ द इयर' नाही तर वयाच्या ६ व्या वर्षीच या बॉलिवूड सिनेमात आलियाने केलंय काम

मुंबई: आज १५ मार्चला आलिया भटचा वाढदिवस आहे. आलियाने बॉलिवूडमध्ये स्वतःला अभिनेत्री म्हणून सिद्ध केलंय. ज अनेक बडे निर्माते - दिग्दर्शक आलिया सोबत काम करण्यास उत्सुक असतात.इतकंच नव्हे तर आलियाने काम केलेल्या RRR सिनेमाने थेट ऑस्कर पर्यंत मजल मारली. त्यामुळे आलिया सातवे आसमान पार आहे.अनेकांना वाटतं करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर मधून आलियाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण असं नाही.. बाबा महेश भट यांच्या एका सिनेमातून आलियाने वयाच्या ६ व्या वर्षीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. हा सिनेमा म्हणजे संघर्ष.१९९९ साली आलेला संघर्ष सिनेमात आशुतोष राणा, अक्षय कुमार, प्रीती झिंटा अशा तगड्या कलाकारांची फौज होती. याच सिनेमातून आलीय भटने वयाच्या ६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.१९९९ साली आलेला संघर्ष हा सिनेमा महेश भट यांनी लिहिला होता तर तनुजा चंद्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. याच सिनेमातून आलियाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. प्रीती झिंटाच्या लहानपणीची भूमिका आलियाने साकारली होती.पुढे मग २०१२ साली आलेल्या स्टुडन्ट ऑफ द इयर या सिनेमातून वयाच्या १९ व्या वर्षी आलियाने बॉलिवूड मध्ये खऱ्या अर्थाने दमदार पदार्पण केलं.

स्टुडन्ट ऑफ द इयर सिनेमातील आलियाच्या अभिनयाचं इतकं कौतुक झालं नाही पण पुढे हायवे, २ स्टेट्स ते काहीच महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या गंगुबाई काठियावाडी अशा सिनेमांमधून आलियाने अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.आलिया भट्ट लवकरच रणवीर सिंग सोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय, ती लवकरच कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल अशी शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने