मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत काढला सेल्फी

अहमदाबाद:टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशीच्या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. दरम्यान, दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यावेळी दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांचे 75 वे वर्ष आज साजरे करण्यात आले.दोन्ही देशातील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी स्टेडियममध्ये होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. यावर भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. असा उल्लेख करण्यात आला आहे.याचं कार्यक्रमामदरम्यानचा एका फोटो व्हायरलं होत आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज भारताचे पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत.पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना दोन्ही देशांमधील ७५ वर्षांच्या क्रिकेट संबंधांचे चित्रण करणारी एक विशेष कलाकृती भेट दिली.बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष कलाकृती सादर केली. यामध्ये दोन्ही देशांमधील ७५ वर्षांचे क्रिकेट संबंध जपले गेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने