एलएलबी प्रवेशासाठी सीईटीची अर्ज प्रक्रिया सुरू; 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : विधी शाखेतील एलएलबी (LLB) या पदवी अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबीच्‍या अर्जासाठी १४ मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. इयत्ता बारावीच्‍या पात्रतेच्‍या आधारावर पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. सीईटी सेलतर्फे यासंदर्भात वेळापत्रक जारी केले आहे.



त्‍यानुसार यापूर्वी ११ मार्चपर्यंत नोंदणीची मुदत दिली होती. परंतु वेळापत्रकात बदल करण्यात आले असून, सुधारित वेळापत्रकानुसार १४ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.दरम्‍यान पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी विधी शाखेत ३ वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्‍ध असून, या अभ्यासक्रमाच्‍या वेळापत्रकाची अद्यापपर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही. येत्‍या काही दिवसांत या अभ्यासक्रमाच्‍या परीक्षा अर्जाबाबत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने