प्रियांका गांधींची डोकेदुखी वाढली; बिग बॉस फेम अर्चनाचा पीएवर गंभीर आरोप

दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह अडचणीत आले आहेत. 'बिग बॉस 16' फेम अर्चना गौतम हिने प्रियांका गांधी यांच्या पीएविरोधात तक्रार दाखल केली आहे. सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रियांकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.अर्चनाचे वडील गौतम यांनी पीए संदीप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'संदीप सिंह यांनी आपल्या मुलीबाबत जातीवाचक उल्लेख केला, तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. ' असे वडील गौतम यांनी म्हटलं आहे.त्यानंतर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सिंह यांच्याविरोधात मेरठमधील परतापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.नेमकं काय आहे प्रकरण?

गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना बऱ्याच दिवसांपासून प्रियंका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. पण संदीप सिंह त्यांना भेटू देत नाहीत.अर्चनाला २६ फेब्रुवारीला प्रियांका गांधी यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी संदीप सिंह यांनी रायपूर छत्तीसगडला बोलावले होते. अर्चनाने प्रियंका गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली, पण पीए संदीप सिंग यांनी नकार दिला.अर्चनाच्या वडिलांचा आरोप आहे की संदीप सिंह यांनी आपल्या मुलीसोबत गैरवर्तन केले. त्यांनी धमकी देत जातीवाचक शब्दही उच्चालले. त्यानंतर अर्चनाच्या वडिलांनी संदीप सिंग विरोधात तक्रार दाखल केली आहे.

तुरुंगात टाकण्याची धमकी

या प्रकरणावर बोलताना अर्चना म्हणाली, संदीप यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली होती. अर्चनाच्या वडिलांनीही मुलीच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी देखील केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने