"अर्थसंकल्प सोप्या भाषेत" पुस्तक फडणवीसांचं अन् प्रकाशन झालं होतं ठाकरेंच्या हस्ते

मुंबई: आज राज्याचा २०२३-२४ सालचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अर्थसंकल्पाचे सादरीकरण होत आहे. पण अर्थसंकल्प ही संकल्पना सामान्य जनतेला समजण्यासाठी क्लिष्ट असते.तर सामान्य जनतेला अर्थसंकल्प समजावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २०२० साली 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षनेते होते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबतची युती तोडून महाविकासा आघाडीची स्थापना केली होती."अर्थसंकल्पात मांडले जाणारे आर्थिक नियोजन सर्वसामान्य जनतेला कळाले पाहिजे या हेतूने तत्कालीन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लिहिले होते. अर्थसंकल्पातील पैसा सामान्य जनतेचा असतो. तर अर्थसंकल्पाची भाषा सोपी असावी, पण अर्थसंकल्पातील काही परिभाषांना पर्याय नसतो, त्या परिभाषा सामान्य जनतेला कळाव्यात या हेतूने हे पुस्तक लिहिलं असून त्याचा सामान्य जनतेला फायदा होईल" असं मत यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.४ मार्च २०२० रोजी या पुस्तकाचे प्रकाशन विधानभवनात करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले होते. तर या सोहळ्याच्या तीन महिन्यापूर्वी शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं. तर विरोधात असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं.या सोहळ्यासाठी तेव्हाचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नीलम गोऱ्हे आदी नेते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने