कर्नाटकात येडीयुरप्पाच भाजपसाठी 'बाहुबली!'; विधानसभा निवडणुकीसाठी...

बेंगळुरू : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर अवलंबून आहे. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेले ८० वर्षीय येडियुरप्पा यांनी कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, अशी पक्षाच्या प्रमुख केंद्रीय नेत्यांची इच्छा आहे.राज्यात तळागाळातून पक्षाची बांधणी करणारे आणि चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले येडियुरप्पा यांची लोकांमध्ये, विशेषत: लिंगायत समाजात बरीच पकड आहे, हे लपून राहिलेले नाही. अर्थात कर्नाटकमध्ये भाजपसाठी येडियुरप्पासाठी बाहुबली आहे.आता पक्ष 'येडियुरप्पा फॅक्टर'वर अवलंबून आहे. त्यांच्या प्रभावाचा पुरेपूर वापर करून त्यांना 'पोस्टर बॉय' म्हणून समोर आणत आहे, हे भाजपच्या निवडणूक चर्चेतून स्पष्ट झाले आहे. अनेकदा पंतप्रधानांच्या कार्यक्रमात इतर कोणी चर्चेत आले असे नाही, पण २७ फेब्रुवारी रोजी शिवमोग्गा येथील जाहीर सभेत मोदींनी कर्नाटकातील भाजपचे सर्वात मोठे नेते येडियुरप्पा यांना कर्मभूमीचा अभिमान म्हटले होते.अलीकडेच शिवमोग्गा विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी येडियुरप्पा यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर सभेत मोदींनी येडियुरप्पा यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान प्रेरणादायी असल्याचं म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने