‘इस्रो’च्या संशोधकांची यशस्वी कामगिरी

बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) ‘मेघा- ट्रॉपिक्स-१ (एमटी-१)’ हा उपग्रह पृथ्वीच्या नियंत्रित वातावरणामध्ये आणून त्याला प्रशांत महासागरामध्ये यशस्वीरीत्या पाडले. ‘इस्रो’कडूनच ट्विटरवर ही माहिती देण्यात आली. १२ ऑक्टोबर २०११ रोजी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.‘इस्रो’ने उष्णकटिबंधीय हवामान आणि इतर वातावरणीय बदलाच्या अभ्यासासाठी तो अवकाशात सोडण्यात आला होता. हा उपग्रह निकामी झाल्याने त्याचा भविष्यातील अवकाश मोहिमांना मोठा धोका निर्माण झाला असता नेमकी हीच बाब लक्षात घेऊन त्याला पृथ्वीवर समुद्रामध्ये पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.संशोधकांनी या उपग्रहाची कक्षा ऑगस्ट २०२२ पासून कमी करण्यास सुरुवात केली होती यासाठी या उपग्रहाने पृथ्वी भोवती २० प्रदक्षिणा मारल्या होत्या त्यामुळे १२० किलोग्रॅम इंधन खर्च झाले होते. शेवटी या उपग्रहाचा अन्य अवकाशीय घटकांशी संपर्क होणार नाही किंवा त्याची त्यांना धडक बसणार नाही याची खात्री पटल्यानंतरच त्याला पृथ्वीवर पाडण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने