भाजपला धोक्याची घंटा!विरोधी पक्ष 325 जागा सहज जिंकतील; सीएसडीएसचा फॉर्म्युला

दिल्ली: पुढच्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांसाठी आता केवळ एक वर्ष बाकी आहे. येत्या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि इतर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्या जेवढे सर्वे येत आहेत त्यामध्ये भाजपलाच बहुमत मिळेल, असं दिसतंय.देशामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येईल, असं सांगितलं जात आहे. परंतु एक फॉर्म्युला असा आहे ज्यामुळे विरोधकांना सहजगत्या सत्ता मिळू शकते. परंतु तो रस्ता खूप अवघड आणि अनिश्चित आहे.निवडणुकांवर अभ्यास करणाऱ्या सीएसडीएस या संस्थेच्या वतीने एक आकडेवारी जारी करण्यात आली आहे. भाजपला सोडून सगळे पक्ष एकत्र आले तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळू शकतं. CSDS ने हा आकडा मागच्या वर्षी सर्व पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरुन काढला आहे.सीएसडीएसच्या आकड्यांच्या हवाल्यावरुन 'आजतक'ने एक रिपोर्ट तयार केला आहे. भाजप विरोधामध्ये जर सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपला २३५ ते २४० जागांवर समाधान मानावं लागेल. दुसरीकडे विरोधी पक्षांना ३०० ते ३०५ जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे २०१९ मध्ये भाजपला ३०३ जागाांवर विजय मिळाला होता तर विरोधकांना २३६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.सीएसडीएसने मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि इतर पक्षांच्या मतांच्या टक्केवारीवरुन हा आकडा काढला आहे. यासह येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये एक टक्का घसरण होऊ शकते. त्यामुळे जागा कमी होऊन २२५-२३० पर्यंत खाली येऊ शकतात. तर विरोधी पक्षांना ३१०-३२५ जागा जिंकता येऊ शकतात.जर भाजपचे दोन टक्के मतं कमी झाले तर त्यांच्या जागा २१० ते २१५ पर्यंत खाली येऊ शकतात. तर विरोधी पक्षांचा आकडा ३२५ ते ३३० होऊ शकतो. DSDSच्या या आकडेवारीमुळे विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी भाजपवगळून इतर पक्षांना एकत्र यावं लागेल, हेही तितकंच खरं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने