बापरे! टायगर एका चित्रपटासाठी घेतो कोट्यवधींचं मानधन; जाणून घ्या 'हीरो'च्या कमाईबद्दल...

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. टायगरने अल्पावधीतच 'अॅक्शन हीरो' म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. टायगर श्रॉफचे खरे नाव हेमंत श्रॉफ असे आहे. पण जॅकी श्रॉफ कायम त्याला 'टायगर' या नावाने हाक मारत असल्याने पुढे तेच नाव रुढ झाले.टायगर हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असला तरी त्याला अभिनेता होण्याची कधीच इच्छा नव्हती. टायगर शाळेत असताना फुटबॉल खेळत असे. तसेच टायगर ला डान्सची आणि व्यायामाचीदेखील आवड होती. त्यामुळे टायगर श्रॉफला खेळाडू व्हायचे होते.टायगरला वडील एक उत्कृष्ट अभिनेते असल्याने त्यांच्यासोबत सतत तुलना होऊ शकते यामुळेदेखील अभिनयक्षेत्रात यायचे नव्हते. मात्र टायगरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलं आहे.'बागी 2','स्टूडेंट ऑफ द इयर','वार','बागी 3' अशा अनेक चित्रपटात टायगरच्या अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला आहे.टायगर श्रॉफ सिनेमांसह त्याच्या लव्हलाईफमुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडले गेले आहे. दिशा आणि टायगर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण अद्याप या दोघांनीही त्यांचे नाते जगजाहीर केलेले नाही.टायगरच्या 'हीरोपंती' या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. तसेच बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटातील डायलॉग सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. चित्रपटात टायगर कृती सेननला म्हणतो,"छोटी बच्ची हो क्या?". टायगरचा हा डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.टायगर चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतो. एका चित्रपटासाठी 'अॅक्शन हीरो' 8 कोटी मानधन घेतो. तर एका जाहिरातीचे टायगर दोन-तीन कोटी घेतो. टायगर वर्षभरात 12 कोटींची कमाई करतो. टायगरची एकूण संपत्ती 81 कोटी आहे. टायगरकडे आलिशान घरासोबत अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने