मुंबई: बॉलिवुड स्टार रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा 'तू झुठी मैं मक्कर' हा चित्रपट आज ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सणानिमित्त सकाळी प्रेक्षकांची संख्या थोडी कमी झाली असली तरी अपेक्षेपेक्षा चांगली आहे.सुरुवातीच्या दिवशी मॉर्निंग शोमध्ये जवळपास 20% प्रेक्षकसंख्या दिसली आहे, तर दिवसाचे अॅडवान्स बुकिंग आणि नंतर संध्याकाळचे शोमध्ये प्रेक्षकांच्या संख्या चांगली असणार आहे.लव रंजनचा हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडी चांगला चित्रपट आहे. सणासुदीच्या काळात अशा चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो असं आतापर्यंत दिसले आहे. अशा परिस्थितीत पहिल्या दिवशी 'तू झुठी में मक्कार'ची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली होणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'तू झुठी मैं मक्कर'च्या कमाईचे आकडे दिले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत चित्रपटाने सुमारे २.३५ कोटींचा व्यवसाय केला आहे. हे आकडे राष्ट्रीय साखळीतील आहेत. पीव्हीआरमध्ये 1.23 कोटी रुपये, आयनॉक्समध्ये 70 लाख रुपये आणि सिनेपोलिसमध्ये 42 लाख रुपये जमा झाले आहेत.चित्रपटाचे हे आकडे फक्तसकाळपर्यंतच्या तीन शोचे सिनेमाचे आहे. यामुळे रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या चित्रपटाला पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'तू झुठी मैं मक्कर' चे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. यापूर्वी त्याने प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा 2 आणि सोनू कि टीटू की स्वीटी सारखे रोमँटिक कॉमेडी शैलीचे चित्रपट केले होते जे हिट ठरले होते.आता लवने रणबीर आणि श्रद्धाच्या बाबतीत असेच काहीसं केलं आहे. रणबीर आणि श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. अशा स्थितीत चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. त्यामुळे आता ही जोडी प्रेक्षकांच मनोरंजन करु शकेल का हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल.कारण गेल्या काही दिवसांत रिलिज झालेल्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर स्थीती काही ठिक नाही. पठाण नंतर बॉक्स ऑफिसवर शहजादा आणि सेल्फी हे दोन चित्रपट रिलिज झाले. ज्यात अक्षय कुमार ,कार्तिक आर्यन, इम्रार हाश्मीसारखे लोकप्रिय चेहरे होते. त्यामुळे आता रणबीर आणि श्रद्धाची जोडी काय कमाल करते हे दिसेलचं.