रणबीर - श्रद्धाचा 'Tu Jhoothi Main Makkar'बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप? काय सांगतात कमाईचे आकडे?

मुंबई: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या त्यांच्या 'तू झुठी में मक्कार' या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहेत. रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या नव्या जोडीला प्रेक्षक खुप पसंत करत आहेत.'तू झुठी में मक्कार' हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित झाला होता. लव रंजन दिग्दर्शित या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाची सुरुवात उत्कृष्ट झाली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 15 कोटींचा व्यवसाय केला आहे. जे वीकेंडला वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.यासोबतच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ९ कोटींचा व्यवसाय केला आहे. तसेच, गुरुवारी या चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटींच्या आसपास होते. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत 26.07 कोटींचा व्यवसाय केला आहे.हे आकडे चित्रपटाच्या ओपनिंगसाठी चांगले आहेत. त्यामुळे आता वीकेंड चा फायदा नक्कीच होईल.विकेंड संपल्यानंतर चित्रपटाचे कलेक्शन 70 ते 80 कोटींवर जावू शकते असा अंदाज आहे. यासोबतच चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता26.07 कोटी रुपये झाले आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरशिवाय अनुभव सिंग बस्सी मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.चित्रपटाचे संगीत प्रीतम दा यांनी दिले आहे. हा चित्रपट जवळपास 95 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून बॉलिवुडकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने