1 एप्रिलला 'एप्रिल फुल' नाही, तर झटकाच बसणार; असं का म्हणाले अजित पवार?

मुंबई: आज राज्याचा अर्थसंकल्प  सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी तो सादर केला. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केलीये.'चुनावी जुमला' असा हा अर्थसंकल्प आहे. वास्तवाचं भान नसणारा अर्थसंकल्प आज साजरा केला गेला, असं अजित पवार  म्हणाले.योजनांना भरीव निधी म्हणजे किती? सरकारनं स्पष्ट केलं नाही. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी शब्दांचे इमले बांधले. हे राज्याच्या परिस्थितीची जाणीव नसलेलं बजेट आहे. शिवरायांच्या नावानं घोषणा दिल्या, पण स्मारकाबाबत उल्लेख नाही. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न झाला, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.माध्यमांशी बोलताना ते पुढं म्हणाले, मला माहिती मिळाली आहे की, हे जे 25 ला अधिवेशन संपेल. तेव्हा 1 एप्रिलला एप्रिल फुल नाही, तर झटकाच बसणार आहे. 30 ते 35 टक्के विजेची दरवाढ होणार आहे. फक्त ते मी आता सांगत नाही. अर्थसंकल्प झाल्यावर सांगेन, असं ते म्हणाले. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने