धंगेकरांच्या उत्तरानंतर चंद्रकांत पाटलांचा नूरच पालटला!

पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या धामधुमीत एक प्रश्न आणि त्याचं मिळालेलं उत्तर चांगलंच गाजलं आहे. तो प्रश्न म्हणजे Who is Dhangekar?. चंद्रकांत पाटलांचा प्रश्न आणि धंगेकरांचं उत्तर हा विषय चर्चेत आहे. आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा त्याविषयी भाष्य केलं आहे.भाजपाचा कसब्याचा गड हिसकावून घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या Who is Dhangekar या प्रश्नाला धंगेकरांनी उत्तर दिलं. निवडणूक जिंकल्यानंतर माध्यमांनी विचारलं असता धंगेकर हात जोडून म्हणाले, "...तर मी रवि धंगेकर." याची चर्चा असतानाच आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना धंगेकरांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.यावेळी मात्र चंद्रकांत पाटील यांनी ठीक आहे, असं म्हणत या विषयावर बोलणं टाळलं. चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी धंगेकरांबद्दल प्रश्न विचारला असता "हो ठीक ठीक चला" असं म्हणत विषय टाळला.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने