मला सतत चर्चा करणे आवडत नाही... द्रविड खेळपट्टीबद्दल स्पष्टच बोलला

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील खेळपट्ट्यांबाबत खूप चर्चा होत आहे. दरम्यान, हेड कोच राहुल द्रविडने खेळपट्टीबद्दल स्पष्ट वक्तव्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.नागपूर कसोटी तीन दिवसांत संपली, दिल्लीतील सामनाही तीन दिवसांत आणि इंदूरचा सामनाही तीन दिवसांत संपला. आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर मालिकेतही हेच पाहायला मिळाले आहे. याचे सर्वात मोठे कारण स्पिन फ्रेंडली विकेट हे सांगितले जात आहे. दरम्यान, खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना राहुल द्रविडने खडेबोल सुनावले आहेत.द्रविड खेळपट्टीबद्दल स्पष्टच बोलला

मला खेळपट्टी ठीक वाटते. खेळपट्टी कशीही असली तरी काही फरक पडत नाही. खेळपट्टीबद्दल नेहमीच खूप चर्चा होत असते. दोन्ही संघांसाठी हे सारखेच आहे. काही वेळा गोलंदाजासाठी ते अधिक आव्हानात्मक असते, तर काही वेळा फलंदाजांसाठी ते अधिक आव्हानात्मक असते. विकेट अशाच असतात, काहीही असो, त्यावर खेळायला शिकले पाहिजे.मी त्यात जास्त लक्ष घालणार नाही. सामनाधिकारी यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. माझे मत काय आहे हे महत्त्वाचे नाही. पण जेव्हा डब्ल्यूटीसीचे गुण धोक्यात असतात तेव्हा तुम्हाला अशा विकेटवर खेळावे लागते ज्यामुळे निकाल मिळतो.अशा परिस्थितीत फलंदाजांना अशा खेळपट्टीवर खेळण्याचा मार्ग शोधावा लागतो.

हे केवळ भारतातच नाही तर जगभर घडत आहे. कधी-कधी योग्य समतोल साधणे सर्वांनाच अवघड जाते आणि ते फक्त इथेच नाही तर इतर ठिकाणीही घडू शकते. 'जेव्हा आपण परदेश दौऱ्यावर जातो तेव्हा आव्हानात्मक विकेट्सवर खेळावे लागते.आम्ही अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत खेळलो जिथे फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली नाही. प्रत्येकाला अशा विकेट्स तयार करायच्या असतात जिथे निकाल येतो.द्रविडच्या या वक्तव्यानंतर खेळाडूंमध्ये काय बदल होतो ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना बाकी आहे. 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथ्या कसोटीला सुरुवात होणार आहे.ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर तिसऱ्या कसोटीत कांगारूंनी दमदार पुनरागमन केले. त्यामुळे मालिका आता 2 - 1 अशी आली आहे. चौथ्या कसोटीत भारताने विजय मिळावला किंवा सामना ड्रॉ झाला तर ते मालिका खिशात घालतील. जर कांगारू जिंकले तर मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सुटेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने