कोहिनूरला 'विजयाची निशानी' म्हणून दाखवणार ब्रिटिश, जाणून घ्या भारतातून लंडनमध्ये कसा पोहचला 'हा' हीरा

मुंबई: जगातील सर्वात चर्चेत असलेला अमुल्य असा 'कोहिनूर' हीरा आता ब्रिटीशांच्या विजयाची निशानी म्हणून दाखवण्यात येणार आहे. या हीऱ्याला टॉवर ऑफ लंडनमध्ये डिस्प्ले केला जाणार आहे. या वर्षी मे महिन्यात या हीऱ्याला पब्लिकसाठी उघडले जाणार.यावर्षी मे महिन्यात ब्रिटेनमध्ये किंग्स चार्ल्सची ताजपोशी होणार या दरम्यान त्यांची पत्नी क्वीन कंसॉर्ट कॅमिला कोहिनूर हीऱ्याचा ताज परीधान करणार नाही.ब्रिटेनच्या महलांमध्ये काम करणाऱ्या चॅरिटी हिस्टोरिक रॉयल पॅलेसेज (एचआरपी) चे म्हणणे आहे की न्यू ज्वेल हाउस एग्जिबिशन कोहिनूरच्या इतिहासाविषयी सांगणार. कोहिनूर हीरा ब्रिटेन ची दिवंगत क्वीन एलिजाबेथची आईच्या ताजमध्ये लावलाय आणि या ताजला टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात येणार.

कोहिनूर चा इतिहास?

कोहिनूर हा जगातला सर्वात चर्चेतला हीरा आहे. 14वी व्या शतकात आंध्र प्रदेश च्या गोलकोंडा येथे एका खदान मध्ये हा हीरा सापडला होता. तेव्हा त्याचं वजन 793 कॅरेट होतं. पण वेळेनुसार या हीऱ्याला कापण्यात आलं ज्यामुळे याचं वजन कमी कमी होत गेलं.एका रिपोर्टनुसार, 1526 मध्ये पानीपत युद्धदरम्यान ग्वालियरचे महाराजा विक्रमजीत सिंहने आपली सर्व संपत्ती आग्राच्या किल्ल्यात ठेवली होती. बाबरने युद्ध जिंकल्यानंतर या किल्ल्याचा ताबा घेतला आणि त्यामुळे कोहिनूर हीराही त्यांच्याजवळ आला तेव्हा हा हीरा186 कॅरेटचा होता.असं म्हणतात की 1738 मध्ये इराणी शासक नादिर शाहने मुगल सल्तनतवर हल्ला केला. तेव्हा हा हीरा त्यांच्याजवळ आला. या हीऱ्याला 'कोहिनूर' नाव नादिर शाह ने दिले होते. ज्याचा हिन्दी अर्थ 'रोशनी का पहाड' असा होतो.नादिर शाह या हीऱ्याला घेऊन इराण गेले होते. 1747 मध्ये नादिर शाहची हत्या झाली. त्यामुळे हा हीरा त्यांचे नातू शाहरुख मिर्जा जवळ आला. शाहरुखने हा हीरा आपले सेनापति अहमद शाह अब्दालीला दिला.अब्दाली या हिऱ्याला घेऊन अफगानिस्तानमध्ये गेला. अब्दालीचे वंशज शुजा शाह जेव्हा लाहोर आले तेव्हा कोहिनूर हीराही त्यांच्यासोबत होता. याबाबत जेव्हा पंजाबचे राजा महाराजा रणजीत सिंह यांना माहिती पडले तेव्हा त्यांनी1813 मध्ये शुजा शाहपासून तो हीरा घेतला.

ब्रिटीशांजवळ कसा पोहचला हा हीरा?

महाराजा रणजीत सिंह कोहिनूर हीरा आपल्या ताजमध्ये परिधान करायचे. 1839 मध्ये त्यांच्या निधनानंतर हा हीरा त्यांचा मुलगा दलीप सिंहजवळ आला.1849 मध्ये ब्रिटेनने महाराजांना हरविले आणि 29 मार्च 1849ला लाहोर के किल्लात एक करार झाला. त्यावेळी दलीप सिंह यांचं वय फक्त 10 होतं. या करारावर महाराजा दलीप सिंह यांच्याकडून हस्ताक्षर करण्यात आले. या करारानुसार कोहिनूर हीरा हा इंग्लंडच्या महाराणीला देण्यात येणार होता.

1850 मध्ये त्यावेळी गवर्नर लॉर्ड डलहोजी कोहिनूरला पहिल्या लाहोरपासून मुंबईला घेऊन आले आणि त्यानंतर लंडनला घेऊन गेले.तीन जुलै 1850 ला कोहिनूरला ब्रिटेनची महाराणी विक्टोरियाच्या समोर सादर केलं.या हीऱ्याला कापण्यात आलं. तेव्हा त्याचं वजन 108.93 कॅरेट होतं. तेव्हापासून हा हीरा महाराणीच्या ताजचा महत्त्वपूर्ण भाग बनला. आता या हीऱ्याचं वजन 105.6 कॅरेट आहे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने ब्रिटेनला कोहिनूर परत द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर अनेकदा भारताने हा हीरा परत मागितला मात्र प्रत्येकवेळी ब्रिटीशांनी नकार दिला. विशेष म्हणजे या हीऱ्यावर फक्त भारतच नाही तर पाकिस्तान आणि अफगाणीस्तानही मालकी हक्क सांगतोय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने