12वी पास असो की पोस्ट ग्रॅज्युएट… बाबा रामदेव तरुणांना बनवणार संन्यासी

मुंबई: योगगुरू बाबा रामदेव यांनी देशातील तरुणांना संन्यासी बनण्याचे निमंत्रण दिले आहे. यासाठी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर माहिती शेअर करण्यासोबतच याबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देखील प्रसिद्ध केल्या आहेत.बाबा रामदेव यांनी यामध्ये सांगितलं आहे की, संन्यासी बनण्याची इच्छा असणारे तरुण-तरुणींना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील याबद्दल यामध्ये माहिती दिली आहे. याकरिता संन्यासी मोहत्सवाचे आयोजन केले जाईल. जो २२ मार्चपासून सुरू होईल आणि रामनवमी म्हणजेच ३० मार्चपर्यंत चालेल. इतकेच नाही तर यासाठी १२वी पास, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट तरुण अर्ज करु शकतात. आज तकने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

बाबा रामदेव यांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये म्हटलं आहे की, कोणत्याही जाती आणि समुदायात जन्म घेतलेला साधारण व्यक्ती देखील मोठी क्रांती करु शकतो. फक्त तो पराक्रमी आणि प्रचंड पुरूषार्थी असावा.बाबा रामदेव यांनी रामनवमी च्या दिवशी पतंजली येथे या आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन संन्यासी जीवन स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पतंजली विश्वविद्यालयात येऊन शिक्षा-दीक्षा घ्या आणि स्वतःमध्ये महान ऋषींप्रमाणे व्यक्तित्व निर्माण करा असे अवाहन केलं आहे.पोस्टरमध्ये पुढे म्हटलं आहे की, कोणत्याही जाती आणि प्रांतातील माता-पिता आपल्या मुलांना शिक्षा-दीक्षा घेऊन आपल्या कुळाचे नाव उंचवण्यासाठी स्वामी रामदेव यांच्याकडे संन्यासाकरिता पाठवू शकता. ही मुले सनातन धर्मासाठी समर्पित राहतील.

याच्या पुढे जात जर कोणी स्व इच्छेने संन्यास घेण्याचा विचार करत असेल आणि त्याचे आई-वडील यासाठी अज्ञानातून किंवा मोहापोटी हे समजून घेत नसतील तर ते आई-वडिलांच्या परवानगीशिवाय देखील पतंजली योगपीठात येऊ शकतात. स्वामी रामदेव आणि महर्षि दयानंद यांच्यासारखे संन्यासी असेच तयार झाले आहेत.बाबा रामदेव यांनी दावा केला आहे की, पतंजली विद्यापीठाठात योगामध्ये बीए, एमए, बीएएमएस आणि बीवायएनएस तसेच तत्वज्ञान, वेदशास्त्र आणि व्याकरणासह संस्कृत आणि साहित्यातील बीए आणि एमए करता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने