बहिणीला स्टेजवर पाहून अर्जुन कपूरचा आनंद गगनात मावेना

 मुंबई: बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांच्यातील प्रेम इंडस्ट्रीत कोणापासूनही लपलेले नाही. दोघेही प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात.अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर आपल्या बहिणीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. तर, नुकतेच अर्जुनची लाडकी बहीण अंशुलाने रॅम्पवर तिची मोहिनी पसरवली आहे. रॅम्पवर बहिणीला पाहून अर्जुनला स्वतःला सावरता आले नाही आणि त्याने सर्वांसमोर आपला आनंद व्यक्त केला.अंशुला कपूरने नुकतेच मुंबईतील फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यादरम्यान अर्जुन आपल्या बहिणीला सपोर्ट करायला पोहचला होता. आपल्या बहिणीला रॅम्प वॉक करताना पाहून अर्जुनच्या आनंदाला पारावार उरला नाही.अंशुला स्टेजवर येताच अर्जुन जोरदार टाळ्या वाजवतो आणि मग तो त्याच्या खुर्चीवरून उभा राहतो आणि त्याच्या बहिणीला चीयर करतो. हे पाहून अंशुलासोबत उपस्थित असलेले सर्वजण हसू लागते. अंशुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अंशुला कपूरने मुंबईतील फॅशन वीकमध्ये शिमरी ड्रेसमध्ये रॅम्पवर धमाका केला. अंशुला कपूर या शिमरी ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. तिचा हा ड्रेस शिमरी आणि ट्रांस्पेरेंट होता.अंशुलाने या ड्रेससोबत केस मोकळे सोडले आहेत, ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर अंशुलाच्या रॅम्प वॉकच्या व्हिडिओवर चाहते त्यावर कमेंट करत अंशुलाचे कौतुक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने