कौतूक हवं असेल तर उन्हाळ्यात क्रीमी कोल्ड कॉफीने खास पाहुण्यांना करा खूश!

मुंबई: रखरखत्या उन्हाळ्यात तूम्ही काही कामासाठी पाहुण्यांकडे गेलात. तर, ते सरबत करतात किंवा चहा घेणार का विचारतात. पण, क्वचित एखादा पाहुना फ्रुट सॅलेड, किंवा आयस्क्रीम, कोल्डींक्सने खूश करतो. तूमच्या घरात पाहुणे येणार असतील आणि ते जरा खासच असतील तर सरबत चहाला दूर सारून वेगळं काय बनवायचं हे पाहुयात.तसं पाहिलं तर चहा कॉफी ही नेहमीचे सोबती आहेत. त्यातल्या त्यात कॉफी अनेकांची फेव्हरेट आहे. त्यामूळेच अनेकांना उन्हाळ्यात कोल्ड कॉफी पिणे आवडते. उन्हाळ्यात क्रीमी कोल्ड कॉफी बनवायची असेल. तर त्याची ही सोप्पी रेसिपी सेव्ह करून ठेवा.कोल्ड कॉफीची ही रेसिपी मींट रेसिपीजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. वाढते तापमान लक्षात घेता घरच्या घरीच थंडगार कॉफी बनवण्यासाठी हे सोपी आयडीया आहे.कॉफीसाठीचे साहीत्य - क्रीमी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी 4-5 चमचे कॉफी पावडर, 12 चमचे साखर, 1 कप थंड दूध, मेल्ट चॉकलेट ड चॉकलेट आणि काही बर्फाचे तुकडे घ्या.क्रीमी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये साखर घालून बारीक करून घ्या. या मिश्रणाच्या बरणीत बर्फाचे तुकडे घाला आणि कॉफी चांगले मिसळा. कॉफी क्रीमी होईपर्यंत मिक्स करत रहा.यानंतर वितळलेले चॉकलेट कपमध्ये घ्या. आता ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका, त्यानंतर ग्लासमध्ये क्रीमी कॉफी घाला. आता त्यावर थंड आणि थंडगार दूध घाला. आणि वरून चॉकलेटने सजवा. आता त्यावर थोडी कॉफी पावडर शिंपडा. तुमची क्रीमी कोल्ड कॉफी तयार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने