जेव्हा डॉक्टरांनीही म्हटलेलं नाही वाचणार अमिताभ.. तेव्हा हनुमान चालिसा हातात धरत जयानं..

मुंबई:  अमिताभ बच्चन यांना सेटवर दुखापत झाल्याची बातमी समोर आल्यानं त्यांचे चाहते चिंतेत आहेत. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे ही चांगली बातमी समोर आलेली आहे. अमिताभ यांनी लवकर बरं व्हावं यासाठी चाहते देवाकडं प्रार्थना करताना दिसत आहेत.बॉलीवूडचे शहंशाह 'प्रोजेक्ट के' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अॅक्शन सीन करताना जखमी झाले आहेत. पण आता चर्चा सुरू झाली ती त्यांच्या कूली सिनेमाच्या सेटवर झालेल्या अपघाताची. १९८२ च्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांचा एवढा मोठा अपघात झाला होता की त्यानंतर संपूर्ण देशातील त्यांच्या चाहत्यांच्या मनात धडकी भरली होती.या अपघातामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती..डॉक्टरांनी तर त्यांना काही मिनिटासाठी मृत घोषित केलं होतं. जया बच्चन यांनी एका मुलाखती दरम्यान ही गोष्ट सांगितली होती. अमिताभ आपल्यात नाहीत हे त्यांना कसं सांगण्यात आलं होतं याविषयी त्या व्यक्त झाल्या होत्या.अमिताभ बच्चन 'प्रोजेक्ट के' शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. त्यांना यातून बरं व्हायला वेळ लागणार आहे..तसंच डॉक्टरांनी देखील त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. 'प्रोजेक्ट के' च्या सेटवर अमिताभचा अपघात झाल्यानंतर आता लोक 'कुली' सिनेमाच्या शूटदरम्यान अमिताभना झालेल्या गंभीर दुखापतीची आठवण काढताना दिसत आहेत.कुलीच्या सेटवर त्यांना झालेली दुखापत इतकी गंभीर होती की २ ऑगस्ट १९८२ सालात आपला दुसरा जन्म झाला असं अमिताभ नेहमी म्हणतात. अमिताभ बच्चन यांनी या घटनेचा उल्लेख आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे.तर सिमी ग्रेवालच्या शो मध्ये गेल्यावर जया बच्चन यांनी देखील 'कुली'च्या वेळी अमिताभ यांची अवस्था कशी होती याचा उल्लेख केला होता.जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ''जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा माझे दीर मला म्हणाले,'तुम्ही कुठे गेला होतात..आम्ही तुम्हाला शोधत होतो'. 

मी म्हणाले की मी मुलांना पहायला घरी गेले होते''.तेव्हा ते मला म्हणाले, ''मी तुला आता जे सांगणार आहे त्यानंतर तुला मन घट्ट करून परिस्थिती सांभाळायची आहे. मी म्हटलं..असं नाही होणार...अमिताभ असं नाही करू शकत माझ्यासोबत..त्यांना काही नाही होणार. माझ्या हातात हनुमान चालिसा होती. डॉक्टर्स तिथून जाताना मला एकच म्हणाले,आता फक्त तुमची प्रार्थनाच आपली मदत करू शकते''.जया पुढे म्हणाल्या,''पण मी हनुमान चालीसा वाचू शकत नव्हते. मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं...डॉक्टर्स काय करतायत हे कळत नव्हतं. मला फक्त दिसत होतं की डॉक्टर्स अमिताभचे हार्ट पंप करत होते,इंजेक्शन्स देत आहेत. त्यानंतर त्यांनी देखील हार मानली''.'' तेवढ्यात मी अमिताभ यांच्या पायाचा अंगठा हलताना पाहिला आणि म्हणाले,त्यांनी अंगठा हलवला,ते जिवंत आहेत''.तेव्हा सिमी जयाला म्हणाल्या,''तेव्हा तुझ्या मनात काय चालू होतं..''जया म्हणाल्या,''मी विचार करणं सोडून दिलं होतं की काय होऊ शकतं. जेव्हा बंगळूरात त्यांची अवस्था बिघडली होती तेव्हा ते काही गोष्टी मला बोलून गेले होते.ज्या माझ्या डोक्यात सारख्या घोळत होत्या. मला विश्वास होता..ते आम्हाला दुःखात सोडून असे जाणार नाहीत''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने