जिंकलंस मर्दा! एमसी स्टॅनचं बॉलीवुडमध्ये पदार्पण! शाहरुखच्या चित्रपटात करणार..

मुंबई: रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यापासून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत, त्याने भल्या भल्या बॉलीवुड सेलेब्रिटींनाही मागे टाकले आहे. सध्या एमसी रस्त्यावर उतरला तरी हजारोंची गर्दी त्याला पाहायला मिळत आहे. अशातच त्याच्या लाखों चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आपल्या हटके बाजाने आणि भन्नाट गाण्याने प्रसिद्ध असलेला स्टॅन बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो एका चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे.मध्यंतरी स्टॅनचे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिदबरोबरचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे साजिद-वाजिदने स्टॅनला चित्रपटात गाणं ऑफर केल्याची चर्चा आहेच. अशातच आता तो चित्रपटात काम करणार असल्याचेही बोलले जात आहे. किंग खान म्हणजे शाहरुखच्या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.एमसी स्टॅनच्या एका फॅन पेजवरुन एक ट्विट करण्यात आले आहे, ज्यामध्ये एमसी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 'जवान' चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्टॅनशी संपर्क साधल्याचे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.परंतु, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून किंवा एमसी कडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या वार्तेने त्याचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत.‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर एमसी स्टॅन भलताच चर्चेत आला आहे. स्टॅनला अनेक ब्रॅण्डकडून जाहिरातींच्या ऑफरही आल्या आहेत. शिवाय देशभरात त्याच्या गाण्यांचे कार्यक्रम होणार आहे. या त्याच्या भारत दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने