होळीचा सण सुरू असतानाच देशभरात 43 जणांचा मृत्यू; अनेक संसार उद्ध्वस्त

मुंबई: होळीचा सण सुरू असतानाच देशभरात अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. लोकांच्या निष्काळजीपणामुळं अनेक घरांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.यातील बहुतांश घटना रस्ते अपघाताच्या आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोणत्या राज्यात किती लोकांचा मृत्यू झाला ते आपण जाणून घेऊ..

दिल्लीत थार कारनं सात जणांना चिरडलं

दक्षिण पश्चिम दिल्लीच्या वसंत विहार भागात भीषण अपघाताची बातमी समोर आलीये. इथं एका वेगवान थार कारनं मंदिराजवळ विक्रेत्याला आणि एका फेरीवाला चिरडलं. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.उत्तर प्रदेशात आठ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातूनही अनेक अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. बाराबंकीच्या बडोसराय, रामनगर आणि कुर्सी भागात होळीच्या दिवशी झालेल्या रस्ते अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात लखनौ जिल्ह्यातील कुर्सी भागात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय, बडोसराय इथं पहाटे कार अपघातात 4 मुलांचा मृत्यू झाला. जैदपूर इथं दुपारी रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

बंगालमध्ये आठ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील हावडा इथं ढोल यात्रेच्या दिवशी झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात आठ जण ठार, तर तीन जण जखमी झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व दुचाकीस्वार होते.

मध्य प्रदेशात पाच जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील टिकमगड परिसरात बोलेरो कार अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये तिघांचा मृत्यू

उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात गंगा नदीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने