राज्यातील नाट्यगृहांसाठी....बजेटमध्ये मनोरंजनाचा खास विचार, म्हणून तर...

मुंबई: राज्याच्या विधीमंडळात सादर केल्या गेलेल्या बजेटमध्ये भाषा आणि मराठी संस्कृतीसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. याशिवाय मनोरंजन क्षेत्रासाठी देखील त्यांनी भरीव तरतूद केल्याचे दिसून आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रातील विविध मागण्यांचा प्रस्ताव प्रलंबित होता.फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील विविध घटकाला दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे. विशेष म्हणजे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्याठी त्यांनी केलेल्या घोषणा विशेष महत्त्वाच्या आहेत.यंदाच्या अर्थसंकल्पात सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रासाठी देखील वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कलाकारांमध्ये देखील आनंदाच्या भावना असल्याचे दिसून आले आहे.राज्यशासनाकडून सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरीमधील विविध सुविधांसाठी115 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामं हाती घेतली जाणार आहे. या विषयावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती.अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.अर्थमंत्र्यांनी आता राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापनाही करण्यात येणार आहे. यापुढील काळात मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळं स्थापन केली जाणार आहेत.श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात सांगण्यात आले असून विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने