भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ! तपासणीसाठी बोलावले बॉम्बपथक

इंदूरभारतीय संघाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीम इंडियाच्या सुरक्षेचा भंग झाला असून यावेळी एका चाहत्याने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला. फॅनने टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारासोबत सेल्फीही काढला. मात्र स्टेडियमशी संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवले आणि बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसलेल्या चाहत्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एकच चाहता घुसला होता. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, दोन चाहते टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले. दोन्ही चाहते स्वयंपाकघरातून ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला. जावेद आणि कय्युम अशी ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करणाऱ्या चाहत्यांची नावे आहेत.दोघेही इंदूरच्या मेवाती परिसरात राहतात. जावेद हा पथारी विकण्याचे काम करतो. गुरुवारी दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दुपारी साडेचारच्या सुमारास दोघे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने