बालेकिल्ल्यात भाजपचा लाजिरवाणा पराभव! धंगेकरांचा दणदणीत विजय

पुणे: कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे.कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 'कसब्यातून रासने आणि धंगेकर याच्यात चुरशीची लढत झाली. या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. 'काटे की टक्कर' अशी ही लढत पाहिला मिळाली होती. मात्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. पाचव्या फेरीनंतर हेमंत रासने रवींद्र धंगेकर यांच्याशी चुरस करताना दिसून आले मात्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली आणि दणदणीत विजय मिळवला.ही निवडणूक एकतर्फी होईल अशी परस्थिती होती. मात्र काँग्रेसने दगडी टक्कर देत भाजपच्या गडाला सुरूंग लावला आहे.



या जागेसाठी अगदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापासून ते भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी मोठी ताकत लावली होती तरी देखील ही जागा भाजपला राखता आली नाही.या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारात उतरले होते. दरम्यान कसबा पेठेत मध्ये ५०.६ टक्के मतदान पार पडलं होतं.पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी, स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांचे एक्झिट पोल व्हायरल होत आहेत.त्यामध्ये कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप या विजयी होतील असं म्हटलं आहे.

कोण आहेत रवींद्र धंगेकर?

२००९ मध्ये भाजपच्या गिरीश बापट यांना ५४ हजार ९८२ तर धंगेकर हे तेव्हा मनसेत असूनही त्यांना ४६ हजार ८२० इतकी मतं मिळाली होती.२०१४ मध्ये काँग्रेसने गिरीश बापट यांच्या विरोधात रोहित टिळक यांना उभे केले होती मात्र याच निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे मनसे मध्येच होते आणि त्यावेळी त्यांना २५ हजार ९९८ मतं मिळाली होती.शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले रविंद्र धंगेकर यांनी जानेवारी २०१७ मध्ये मुंबईत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या काळात कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत.पोटनिवडणुकीसाठी आपली तयारी झाली असून विरोधकांकडून कोणताही उमेदवार असला तरी निवडणूक जिंकू असा विश्वास, असं धंगेकर यांनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. भाजप खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने