सगळा कट देवेंद्र फडणवीसांना अडकवण्यासाठी? पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच दिल्याचं प्रकरण सध्या चांगलंच वादात आहे. या प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत.हा सगळा कट देवेंद्र फडणवीसांना अडकवण्यासाठी आखण्यात आला असावा, असा दावा पोलिसांनी केला आहे. अनिक्षाने अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे काही बनावट व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपही बनवल्या आहेत. अनिक्षाने त्यांच्याकडे १० कोटी खंडणीची मागणी केली होती.अनिक्षाने या क्लिप्स अमृता फडणवीसांना पाठवल्या आणि त्या डिलीट करण्याच्या बदल्यात १० कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलिसांत धाव घेतली. पैसे दिले नाहीत, तर क्लिप व्हायरल करू अशी धमकी आपण अमृता फडणवीसांना दिल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.या प्रकरणामध्ये काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. पुढील तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अनिक्षाची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने तिला २१ मार्चपर्यंतच कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने