भाऊ कदमच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर कल्ला.. लोक देऊ लागले थेट लग्नाची सुपारी..

मुंबई: कलाकार म्हटलं की त्यांना सणानिमित्तानं लग्नानिमित्तानं मोठमोठ्या सुपाऱ्या दिल्या जातात हे आपल्याला माहितच आहे. अनेक कलाकर लाखो रुपय़े या सुपाऱ्यांमधूनच कमावतात.दहीहंडी, गणेशोत्सव अशा मोठमोठ्या सार्वजनिक सणांना कलाकारांना सुपारी देऊन साधारण त्यांना एखादं स्कीट सादर करायला सांगितलं जातं किंवा मग एखाद्या गाण्यावर परफॉर्मन्स किंवा कधीतरी नुसतीच भेट,लोकांशी थोडाफार संवाद साधायचा असतो.पण भाऊ कदमनं नुकत्याच शेअर केलेल्या आपल्या एका व्हिडीओत त्यानं आपल्या अभिनय कलेला बाजूला ठेवून अशी काही कला सादर केली की सोशल मीडियावर त्याला लग्नात सुपारी घेता का..घ्याल का..असं विचारलं जातंय.चला त्या भन्नाट व्हिडीओविषयी जाऊन घेऊया.भाऊनं पोस्ट केलेला हा व्हिडीओ धुळवडीचा आहे. मराठी कलाकारांची धुळवड ठाण्यात मोठ्या जल्लोषात पार पडली. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार ठाण्यातील या धुळवडीच्या कार्यक्रमात हजर होते.या कार्यक्रमातलाच एक व्हिडीओ भाऊनं पोस्ट केला जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये भाऊ कदम...विजू माने आणि दिग्दर्शक अभिजित पानसे बॅन्जो वाजवताना दिसत आहेत.आता यात विजू आणि अभिजित पानसे वाद्य बडवताना दिसत असले तरी भाऊ मात्र ताला-सुरात वाजवताना दिसतोय. त्यामुळे आता याच व्हिडीओवर काही भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.भाऊ कदमला एकदम तालबद्द शिस्तीत सुरात वाजवताना पाहून एका चाहत्यानं चक्क त्याला विचारलं आहे की,'तुम्ही लग्नाची सुपारी घेता का?'तर अनेकजण भाऊची ही नवी कला पाहून त्याच्यावर फिदा झाले आहेत. सध्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर नुसता कल्ला केला आहे. आणि भाऊला चाहते सुपारीची ऑफर देऊ लागलेयत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने