कर्नल गीता राणांनी रचला इतिहास; 'या' विभागाचं नेतृत्व करणाऱ्या ठरल्या पहिल्या महिला अधिकारी

दिल्ली: आज प्रत्येक क्षेत्रात महिला भारताचं नाव रोशन करत आहेत. यासोबतच भारतीय लष्करातील  महिलाही अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाचं रक्षण करताना दिसत आहेत.दरम्यान, कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मेकॅनिकल इंजिनिअर्सच्या कर्नल गीता राणा  यांनी मोठा इतिहास रचला आहे. त्या पूर्व लडाखमधील एका अग्रेषित आणि दुर्गम ठिकाणी स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची कमान हाती घेणारी पहिली महिला अधिकारी बनल्या आहेत.भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कर्नल गीता राणा या पूर्व लडाखच्या फॉरवर्ड आणि दुर्गम भागात फील्ड वर्कशॉपचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. गीता सध्या कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मेकॅनिकल इंजिनिअर्समध्ये कर्नल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने