गॅस दर वाढीवरून विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर मांडली चूल

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. सरकार विरोधात विरोधी पक्ष सतत आक्रमक होताना दिसत आहे. आज देखील विरोधी पक्षातील नेत्यांनी आणि आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले.आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ आणि महागाईच मविआकडून निषेध करण्यात आला. या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय, खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले,बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.यावेळी विधानसभेत अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आला. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये पहिल्याच पानावर एक बातमी आली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी म्हणजेच त्यांची धर्मपत्नी अमृता फडणवीस यांच्यासंदर्भात एक बातमी आली आहे. आम्हाला सभागृहाला माहिती हवी आहे की या प्रकरणात सत्यता काय आहे. सर्वांना समजला पाहिजे की, हे नेमकं काय प्रकरण आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने