आम्हाला स्मारक-पुतळे नकोय , पण...; पंकजा यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे महत्त्वपूर्ण मागणी

बी़ड: मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात फारशा चर्चेत नसलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक पावित्र्यात दिसल्या. गोपीनाथ मुंडे पुर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री दादाजी भुसे, राधाकृष्ण विखे-पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी पंकजा यांनी जोरदार भाषण केलं.पंकजा मुंडे म्हणाल्या, आमचा कोणताही कार्यक्रम असो, पाऊस असतो. तरी आम्ही इथं थांबणार आहे. आम्ही थकणार नाही, झुकणार नाही. मुंडे साहेबांच्या राजकारणात आक्रमकपणा होता. पत्रकार विचारता, तुम्ही संयमाने बोलतात. मी सांगते, त्यांनी संघर्ष केला होता.



पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांचं स्मारक २०१४ मध्ये होणार होतं. पण ते झालं नाही. ते का झालं नाही, हे महत्त्वाचं नाही. पण माझी विनंती आहे की, तुम्ही मुंडे साहेबांचं स्मारक बांधुच नका. या महाराष्ट्रात, नाशिक, नगर, बीड, पुणे, नवी मुंबई या सारख्या महत्त्वाच्या शहरात आमच्या उततोड मजुरांच्या मुलांसाठी वसतीगृह बांधा, अशी विनंती पकंजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.छत्रपती संभाजीनगर येथे स्मारक नका बांधू, तिथं एक मोठं हॉस्पिटल बांधा, जेणे करून गोरगरिब आणि वंचितांना उपचार घेता येईल. कारण पुतळे-स्मारक उसतोड कामगार स्वत:च्या पैशातून उभारलं. अनेकांनी आपल्या घरातील मुलांच्या शिक्षणासाठीचा पैसा गोपिनाथ गडासाठी दिला आहे. आता त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांची लेकीची आहे. दुर्दैवाने सत्तेत असताना उसतोड मजुरांच्या लेकरांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली नाही. पण शिंदे साहेब तुम्ही हे काम कराल, असा आम्हाला विश्वास असल्याचं पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने