ब्रिटीशांच्या विरोधात का उभारलं गेलं होतं ताज हॉटेल? जाणून घ्या रोमांचक कहाणी

मुंबई: मुंबईतील ताज हॉटेलया हॉटेलचे सुरवातीपासूनच अनेक किस्से आहेत. जमशेदजी टाटा यांनी हे हॉटेल यासाठी उभारले होते कारण त्यांना एकदा सर्वात भव्य हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली होती.ब्रिटिशांची जेव्हा सत्ता होती, तेव्हाची ही गोष्ट. जमशेदजी जेव्हा एका मोठ्या हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यांना सांगण्यात आले होते की येथे फक्त ब्रिटिशच येऊ शकतात फक्त इंग्रजांनाच परवानगी होती. मुंबईच्या काला घोडा परिसरात असलेले वॉटसन नावाचे ते हॉटेल होते. सर्वांनाच माहिती आहे. या हॉटेलची एंटीक डिझाइन, समोर समुद्र आणि गेट वे ऑफ इंडियाचा सुंदर नजारा पाहून व्यक्तीचा आत्मा तृप्त होतो पण तुम्हाला माहिती आहे का की या हॉटेलची उभारणी कशी झाली? आज जमशेदजी टाटा यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनीच हे हॉटेल बांधले होते.आज आपण या रोमांचक कहाणीविषयी सांगणार आहोत.जमशेदजी टाटा यांनी हा संपुर्ण भारतीयांचा अपमान असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की ते एक असं हॉटेल बनवणार जिथे भारतीयच नाही तर विदेशी लोकही येऊ शकणार. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेल उभारलं आणि 16 डिसेंबर 1903 ला हे हॉटेल सामान्य लोकांसाठी सुरू केलं.असंही म्हणतात की जमशेदजी टाटा या हॉटेलवर इतकं प्रेम करायचे की त्यांनी स्वत: देश-विदेश फिरुन हॉटेलचे इंटीरियर डिझाइनसाठी सामान एकत्र केले होते. ते लंडन, पेरिस, बर्लिन जायचे आणि डेकोरेशनसाठी हे पण आवडायचे ते घेऊन यायचे.2010 या वर्षी दिलेल्या माहितीनुसार या ताज हॉटेल्स प्रत्येक वर्षी 20,000 लोकांना रोजगार देते. आज ताज हॉटेल्सचे 100 पेक्षा जास्त हॉटेल्स आहे. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांनी या हॉटेलवर हल्ला केला होता. ज्यानंतर 2010 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा येथे थांबले होते. त्या दरम्यान ते म्हणाले होते की ताज हॉटेल भारताच्या मजबूतीचं प्रतीक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने