आईचे तुकडे केले, मृतदेहाचा वास लपवण्यासाठी १०० परफ्युम विकत घेतले!

मुंबई: मुंबईत आपल्या आईची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय मुलीला अटक केली आहे. या मुलीने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन कपाटात भरुन ठेवले होते. या प्रकरणी पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे होत आहेत.मृत महिलेचं नाव वीणा जैन असं असून तिचा खून तिच्याच सख्ख्या मुलीने केला आहे. रिंकल जैन असं तिचं नाव आहे. आईच्या हत्येनंतर मेडिकलमधून १०० परफ्युमच्या बाटल्या आणि एअर फ्रेशनर्स खरेदी केल्याचं या मुलीने कबुल केलं आहे. मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये म्हणून तिने हे खरेदी केले होते.रिंकलने आपल्या आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. ते प्लास्टिकच्या पिशवीत भरून ही पिशवी कपाटात ठेवली. बराच काळ वीणा यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या भावाला संशय आला. त्यानंतर त्याला संशय आला. घरातूनही उग्र वास येऊ लागला. त्यानंतर त्याने पोलिसांना कळवलं आणि या खुनाचा उलगडा झाला.पोलीस तपासात रिंकलनेच रोजच्या घरगुती वादांना कंटाळून आपल्या आईचा खून केल्याचं समोर आलं. रिंकलने खुनाची कबुलीही दिली आहे. तिने सांगितलं की, आईचा खून केल्यावर तिने मृतदेह कापला. तेव्हापासून ती दिवसभर घराच्या खिडकीत उभी राहायची आणि लालबाग जंक्शनवरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवायची. तिला कशातही रस नव्हता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने