सामंथाने 'कुशी'च्या शूटिंगला केली सुरुवात, विजय देवरकोंडा आणि टीमने अभिनेत्रीचं असं केलं स्वागत

मुंबई: समंथा रुथ प्रभू तिच्या आगामी 'कुशी' चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. अलीकडे, अभिनेत्रीला आरोग्याच्या समस्येने ग्रासले होते, त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग लांबले. यानंतर, चाहते सोशल मीडियावर अभिनेत्रीकडून चित्रपटाशी संबंधित माहितीची मागणी करत होते.त्यानंतर अभिनेत्रीने चाहत्यांना चित्रपटाच्या शूटिंगवर लवकरच परतण्याचे आश्वासन दिले. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अभिनेत्री आता तेलुगु रोमँटिक चित्रपट 'कुशी'च्या सेटवर परतली आहे.या अभिनेत्रीने चित्रपटाच्या सेटवर परतून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले. काल, 8 मार्च म्हणजेच महिला दिनी, अभिनेत्रीने हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले. टीमने तिचे जल्लोषात स्वागत केले. विजय देवरकोंडा, दिग्दर्शक शिवा निर्वाण आणि टीमने तिचे केक कट करून स्वागत केले आणि महिला दिनही साजरा केला.'कुशी'च्या टीमने समांथाचे स्वागत करण्यासाठी, तिला महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीत 13 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेटवर एक मोठा बॅनर लावला होता. दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी सेटवरील सामंथाचे काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती हसत होती.फोटोंमध्ये ती विजय देवरकोंडा आणि 'कुशी' टीमसोबत केक कापताना दिसली. पीच रंगाच्या एथनिक सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. ही छायाचित्रे शेअर करताना दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी लिहिले की, 'द फायटर समंथा रुथ प्रभू 'कुशी'च्या सेटवर परतली आहे'.

'कुशी'चे शूटिंग बऱ्याच दिवसांनी पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता त्यामुळे लवकरच शूटिंग पूर्ण करण्याचा टीमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात काश्मीरमध्ये 'कुशी'चे पहिले शेड्युल पूर्ण झाले.समंथाने उघड केले की ती मायोसिटिस नावाच्या दुर्मिळ रोगाने ग्रस्त होती. उपचारासाठी अभिनेत्रीने कामातून ब्रेक घेतला. त्यामुळे 'कुशी'चे शूटिंग अनेक महिने पुढे ढकलावे लागले.फेब्रुवारी 2023 दरम्यान, समांथाने शूटिंगला उशीर झाल्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली होती आणि लवकरच शूटिंग सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आता समंथाने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. लवकरच चाहत्यांना समंथा आणि विजयची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने