काय सांगताय? तुमची करंगळी सांगते तुमची पर्सनॅलिटी; स्वभाव, व्यक्तिमत्व अन् बरंच काही...

मुंबई: हस्तरेषा विज्ञानानुसार तुमची करंगळी तुमच्या पर्सनॅलिटीचे बरेच रहस्य उलगडते. तुमच्या व्यक्तीमत्वातील मूळ गोष्टी तुमच्या करंगळीच्या आकार आणि उंचीवरून कळू शकते.असं म्हटलं जातं की तुमची करंगळी तुमच्या पर्सनॅलिटीचे बरेच रहस्य उलगडते. चला तर तुमच्या हाताची करंगळीची लांबी आणि रूंदी तुमच्या पर्सनॅलिटीबाबत काय सांगते ते जाणून घेऊया.

तुमची करंगळी अनामिकेच्या तुलनेत टॉप पोरच्या खाली असल्यास...

करंगळीची उंची अनामिकेच्या टॉप जॉइनच्या खाली असेल तर तुम्ही लाजाळू आणि रिझर्व्ह व्यक्तिमत्वाचे स्वामी असल्याचे दर्शवते. यातून हे देखील कळते की तुमचे व्यक्तिमत्व चांगले असून तुमची स्वप्ने मोठी आहे. मात्र तुमच्या भित्र्या स्वभावामुळे तुम्ही मागे आहात. तरीदेखील तुमच्या प्रयत्नातून तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू शकता.

तुमची करंगळी अनामिकेच्या टॉप जॉइंटच्या बरोबर उंचीत असेल तर..

जर तुमच्या करंगळीची टॉप पोजिशन अनामिकेच्या वरच्या जॉइंटच्या बरोबरीच्या उंचीत असेल तर तुमचं व्यक्तिमत्व अगदी संतुलित आहे.कितीही तणावपूर्ण परिस्थिती असली तरी अशा व्यक्ती संयमाने हाताळतात. तुमच्या अशा स्वभावामुळे काहींना तुम्ही गंभीर नसल्याचेही वाटू शकते. मात्र तुम्हाला समजून घेतल्यानंतर तुमचा हा गैरसमज दूर होईल.तुमची करंगळी अनामिकेपेक्षा लांब असेल तर...

तुमची करंगळी अनामिकेपेक्षा उंच असल्यास तुम्ही फार आकर्षक आणि मनमिळाऊ असू शकता.त्यामुळे अनेकजण तुमच्या स्वभावगुणांचा गंभीरतेने विचारही करतात. मात्र तुमच्या पर्सनॅलिटीला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला अनेक परीश्रम घ्यावे लागतात.

तुमची करंगळी अनामिकेच्या उंचीत अशी असेल तर..

तुमची करंगळी या आकाराची आणि उंचीची असेल तर याचा अर्थ तुम्हाला पदप्रेमी असू शकता.सीईओ, अध्यक्ष यांसारख्या पदावर तुम्ही विराजमान होऊ शकता. तसेच तुमच्यात पुढे जाण्याची क्षमताही दिसून येते.अशाप्रकारे तुमच्या करंगळीच्या आकारावरून आणि उंचीवरून तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीचा अंदाज लावू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने