'मराठीत आधी रडके पिक्चर्स का बनायचे..', पोस्ट करत मिलिंद गवळीनं सांगितलं त्यामागचं सीक्रेट

 मुंबई: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनिरुद्ध या पात्राचा सध्या आपल्या सगळ्यांना नेहमीपेक्षा जास्त राग येत असावा. अरुंधतीच्या लग्नात तो जे काही अडथळे आणत होता किंवा त्यांनतरही त्याचं जे काही हे लग्न तोडण्यासाठी सुरु आहे हे सगळं ऐकून कसला माणूस आहे म्हणत तुम्ही त्या अनिरुद्धला हिणवतच असाल.पण हे अनिरुद्ध पात्र रंगवणारा मिलिंद गवळी मात्र प्रत्यक्षात एकदम विरोधी स्वभावाचा आहे. त्याला स्वतःला हे अनिरुद्ध पात्र आवडत नाही,..म्हणजे माणूस म्हणून बरं का.. हे त्यानं देखील सांगितलं आहे.

मिलिंद गवळी अनिरुद्ध म्हणून जेवढा चर्चेत येतो त्याहून अधिक तो सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकतीच त्यानं एक पोस्ट केलीय त्यात त्यानं मराठीत आधी रडकेच चित्रपट का बनायचे...निर्मात्यांचे त्यामागे काय गणित असायचे याविषयी खुलासा केला आहे.आता मिलिंद गवळी अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहे. मराठी हिंदी मालिका,सिनेमा यामधून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत त्यानं आपलं नाव कमावलं आहे. यातले मिलिंदचे जर आधीचे काही सिनेमे पाहिले असतील तर बऱ्यापैकी रडकेच...आता मिलिंदलाही तेव्हा तो प्रश्न पडायचा..मराठीत रडके सिनेमे का बनतात..आणि बरं बनतात ते बनतात ते चालतात कसे...पण तरिदेखील तो विचार करायचा..मनोरंजन लोकांना हसवण्यासाठी असावं रडवण्यासाठी नाही..तेव्हा त्यानं त्या काळातील एका बड्या मराठी निर्मात्याला न राहवून हा प्रश्न विचारलाच की मराठीत आपण रडके चित्रपट का बनवायचे तेव्हा त्या निर्मात्यानं दिलेलं उत्तर नुकतंच मिलिंदने पोस्टच्या माध्यमातून लोकांसमोर सांगितलं आहे.सोबत रडणं माणसासाठी किती आवश्यक आहे हे सांगताना त्याचं महत्त्व देखील पटवून दिलं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणाला आहे मिलिंद आपल्या पोस्टमध्ये रडावसं वाटलं तर माणसाने रडावं मन मोकळं करावं असंख्य गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात ,मनाला दुखावणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात ,आपल्या मनाला त्याचा त्रास होत असतो आणि ते सतत चालू असतं.आणि खूप आतल्या आत आपण साठवून ठेवत असतो,मग अचानक बांध फुटतो आणि आपण उपसाभक्षी ढसाढसा रडायला लागतो आणि मग रडून झालं की मन शांत होत , आपल्याला बरं वाटतं

पूर्वीच्या काळी कुणी गेलं आणि जर त्याचा जवळचा व्यक्ती रडत नसेल तर त्याला जबरदस्ती रडायला लावायचे,कित्येक वेळा माझ्या कानावर ते शब्द पडलेले आहेत , “मोकळी हो बाई मोकळी हो रड.”एकदा producer कैं. अण्णासाहेब देशपांडे यांना मी म्हणालो होतो "का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं, "त्यांनी मला सांगितलं होतं की,गावा खेड्यातल्या बायका आयुष्यामध्ये खूप सोसतात खूप सहन करतात, सिनेमाच्या माध्यमातून त्या मोकळ्या होतात, त्यांचं मन शांत होतं, आमच्या प्रोडूसर कैं. वासवानीने "सुन लाडकी सासरची " चित्रपटांमध्ये बायकांना हात रुमाल वाटले होते,त्यांना इतकी खात्री होती की सिनेमा बघताना बायका भरभरून रडणार.सिनेमात काम करताना आम्हाला बरेच वेळेला रडायचे प्रसंग येतात, आम्हचं काम करत असताना मन मोकळं होतं,सामान्य माणसाचं काय होत असेल, काहींना तर रडायची अजिबात सवयच नसते, च्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं मनामध्ये साठवून राहत असेल का?टॉक्सिक Toxic होत असेल का? Stressful होत असेल का? म्हणून लोक आजारी पडत असतील का?महत्त्वाचं म्हणजे जो माणूस रडतो, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो संवेदनशील तर असतोच पण तोच खरं आयुष्य जगतो असं मला वाटतं....

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने