'तुम्ही म्हणाल तशी पार्टी देईल, फक्त...' राजामौलींच्याबाबत RRR चा रामचरण बोलून गेला!

मुंबई: टॉलीवूडचे प्रख्यात दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील त्या गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. असा बहुमान मिळवणारा तो पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. ऑस्कर मिळण्यापूर्वी हॉलीवूडच्या कित्येक दिग्गजांनी राजामौलींचे तोंडभरून कौतूक केले होते.जगप्रसिद्ध अवतार या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी तर राजामौलींचे यांचे कौतूक करताना कोणताही संकुचितपणा दाखवला नाही. त्यांनी मुक्तकंठानं त्यांची स्तुती केली. एवढेच नाही तर आगामी त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याचीही विनंती केली. आता त्या मागणीचा राजामौली विचार करतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.याशिवाय ज्यांनी नाटू नाटू गाणे लिहिले त्या गीतकारानं देखील आपल्या गीताचे हॉलीवूडच्या टॉम क्रुझनं कसे कौतूक केले याविषयी सांगितले. ऑस्कर विजेते दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या पत्नीनं देखील आपण हा चित्रपट दोन वेळा पाहिल्याचे सांगत त्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. यासगळ्यात RRR मधील स्टार अभिनेता रामचरणच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.रामचरणनं तर एक मोठी घोषणा करुन टाकली आहे.ज्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. रामचरण म्हणतो, मी सगळ्यांना मोठी पार्टी द्यायला तयार आहे फक्त राजामौलींनी त्या एका गोष्टीसाठी तयार व्हावे. ती गोष्ट म्हणजे राजामौलींना जर येत्या काळात मार्वल स्टुडिओची फिल्म दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली तर मी एक मोठी पार्टी द्यायला तयार आहे. असे रामचरणनं म्हटले आहे.एका मुलाखतीमध्ये रामचरण यांनं जे काही सांगितलं त्यावरुन चाहत्यांनी राजामौली यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाणही आले आहे. यापूर्वी देखील राजामौलींना हॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांनी ऑफर दिल्याच्या चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने