अर्थमंत्र्याची मोठी घोषणा! महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचार मर्यादा पाच लाखांवर

मुंबई: अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. आरोग्य विभागासाठी ३ हजार ५२० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.तर आपला दवाखाना उपक्रम आपण सुरू केला त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला, तो पाहता आता संपूर्ण राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे ७०० आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने