ज्याचं पोट मोठ तो सर्वश्रेष्ठ! या लोकांची वजन वाढवण्याची निंजा टेक्निक

इथिओपिया: आजकाल एखाद्याचे वजन जास्त असेल. तर, त्याला त्याची लाज वाटत असते. अनफिट ड्रेस, शर्ट, पॅन्ट्स तर फेकून द्याव्या लागतात. कारण, आपणच फिट लोक कसे असतात याचा एक नियम बनवला आहे. त्याला धरू आपण बारीक की जाड हे मोजत असतो आणि स्वत:ला कमी समजत असतो.आदिवासी लोक आपल्या सारखे पुढारलेले नसतात. मात्र, ते त्यांच्या जगात अगदी छान जगतात. त्यांना आपण वजनासंबंधी, रिती परंपरा यासंबंधी घातलेले नियम मान्य नसतात. पण, तरीही ते त्यांचा आनंद त्यांच्या परंपरा पाळून मिळवत असतात.

जगात कुठेही गेलात तरी जास्त वजन असेल तर लाज बाळगणाऱ्यांना आश्चर्यचकीत करणारी एक जागा आहे. त्या जागेत बेढब, वजनदार लोकांना सर्वश्रेष्ठ असल्याचा पुरस्कार दिला जातो. अशी एक स्पर्धा भरते, ज्यात लोकांचे सुटलेले पोटच त्यांना पुरस्कार मिळवून देते.जेवढे मोठे पोट तेवढा तो पुरूष आकर्षक आणि श्रेष्ठ ठरतो. या जमातीतील लोकांसाठी सुटलेले पोट ही आनंदाची बाब आहे. इथिओपियाच्या ओमो व्हॅलीमध्ये राहणाऱ्या या लोकांमध्ये पुरुषांचे बेढब पोट प्रभावी आणि सुंदर मानले जाते. हे लोक वर्षातून एकदा काएल नावाचा सण साजरा करतात. ज्यामध्ये सर्वात धष्टपुष्ट पोट असलेल्या माणसाला आदिवासी लोकांमध्ये सन्मान आणि आदर दिला जातो.कसे वाढवतात वजन

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुरुष दूध, दही, कच्चे रक्त आणि मध यांचे सेवन करतात. ६ महिने तयारी करून ते या उत्सवात सहभागी होतात. वजन वाढेल असा आहार घेतल्यानंतर ते स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवतात.हे लोक आपले शरीर बनवण्यासाठी गाईचे दूध आणि गायीचे ताजे रक्त पितात, असे सांगितले जाते. या जमातीमध्ये गाय पवित्र मानली जाते. ते गायीला मारत नाहीत तर तिला छोटी जखम करून तिच्या रक्तवाहिनीतून रक्त काढतात. त्याचा उपयोग ते त्यांच्या डायटमध्ये करतात.गायीला झालेली जखम भरून येण्यासाठी ते तिच्यावर औषधोपचारही करतात. वजन वाढवण्यासाठी हे लोक ६ महिने कोणतेही काम करत नाहीत. केवळ खातात आणि त्यांच्या झोपडीत आराम करतात. या जमातीचे लोक फिट असले तरी स्पर्धेसाठी वजन वाढवतात. स्पर्धा संपली की थोड्यात काळात ते पुन्हा आपले पोट पूर्वपदावर येण्यासाठी मेहनत घेतात. त्यासाठी खाणे कमी करून कष्ट जास्त करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने