सभागृहात बोलताना राहुल गांधींचा माईक २० मिनिटे बंद, हा तर आवाज दाबण्याचा प्रयत्न : काँग्रेस

नवी दिल्ली: सरकारने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीसाठी विरोधकांच्या मागण्या रोखण्यासाठी लोकसभेतील माइक बंद केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच सत्ताधारी भाजपने राहुल गांधींना संसदेत बोलू न देण्याचा निर्णय घेतल्याचाही आरोप केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतातील 'लोकशाहीबाबत केलेल्या विधानावर माफी मागितल्याशिवाय त्यांना बोलू न देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी गेल्या महिन्यात राज्यसभेत केलेल्या भाषणात गांधी कुटुंबाला लक्ष्य केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव दाखल केला आहे. गांधी दांपत्याने 'नेहरू' हे आडनाव का निवडले नाही, असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी भाषणात केला होता.विशेषाधिकार नोटीसमध्ये आरोप करण्यात आला की, मोदींच्या वक्तव्याचा सूर आणि आशय अपमानजनक आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांचे ब्रिटनमधील वक्तव्यामुळे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने