भारत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कसोटी पाहण्यासाठी मैदानात, कर्णधारांना दिलं खास गिफ्ट

अहमदाबाद: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज स्टेडियममध्ये उपस्थित आहेत.टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर आहेत. पंतप्रधान मोदी स्टेडियममध्ये दीड तास थांबणार असून ते खेळाडूंचीही भेट घेणार आहेत.सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या क्रिकेट संघाच्या कर्णधाराचा गौरव केला आणि विशिष्ट कसोटी सामन्यासाठी त्यांना खास कॅप दिली.या सामन्यातील नाणेफेकीसाठी एक खास नाणे बनवण्यात आले होते, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या 75 वर्षांच्या क्रिकेट स्मृतींचे चित्रण करण्यात आले होते. नाणेफेकीनंतर रवी शास्त्री यांनी पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भारतीय क्रिकेटशी संबंधित खास आठवणी सांगितल्या आणि त्यांचे फोटोही दाखवले.यादरम्यान रवी शास्त्री यांनी दोन्ही नेत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटशी संबंधित आठवणी सांगितल्या. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींना एक विशेष आर्टवर्क भेट केले. ज्यामध्ये दोन्ही देशांमधील 75 वर्षांच्या क्रिकेट संबंधांचे चित्रण करण्यात आले आहे.टीम इंडिया मालिकेत 2-1 ने पुढे आहे. असं असलं तरी मालिका विजयासाठी हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने