'वेड' नंतर बरसणार प्रेमाच्या 'सरी', Mrinal Kulkarni आणि Ajinkya Raut चा नवा रोमँटिक सिनेमा

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २०२२ च्या वर्षाअखेरीस प्रदर्शित झालेला वेड या रोमँटिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. आता वेड नंतर आणखी एक रोमँटिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.'सरी' असं या सिनेमाचं नाव असून सिनेमाचं हटके पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या पोस्टरमध्ये तीन बोटं दिल जोडताना दिसत आहेत. आयुष्य कधीतरी एका अशा वळणावर येते, जिथे पुढे काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही.म्हणूनच म्हणतात की, 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. याच आशयाचा 'सरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.नुकतेच या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसतील.कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन अशोका के. एस. यांनी केले असून,दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर 'सरी'च्या निमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, '' मी प्रथमच मराठीत चित्रपट दिग्दर्शित करत आहे. मराठीत काम करताना मजा आली. मराठी कलाकार अतिशय प्रतिभाशाली आहेत. चित्रपटाबद्दल सांगायचं तर ही एक प्रेमकहाणी आहे.प्रेमात पडलेल्या तरुणतरुणींच्या आयुष्यात अनेक वळणे येतात, अनेक आश्चर्यकारक घटना घडतात, चमत्कार घडतात, ज्यांचा कधी कोणी विचारही केलेला नसतो.मनाला भिडणारी ही कथा आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल.'' ५ मे २०२३ ला 'सरी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने