फक्त अभिमान ..! Jr. NTR आणि राम चरण नाही तर हि हॉलिवूड अभिनेत्री करणार Natu Natu वर डान्स

मुंबई: साऊथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR या सिनेमाने जगभर वेगळी ओळख निर्माण केली आहे.गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील नाटू नाटू गाणं ऑस्करच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे सर्व भारतीयांना Natu Natu गाणं ऑस्कर जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.गेल्या काही दिवसांपासुन Jr. NTR आणि राम चरण ऑस्कर २०२३ मध्ये जगप्रसिद्ध झालेल्या नाटू नाटू गाण्यावर सर्वांसमोर लाईव्ह डान्स परफॉर्मन्स करणार अशी चर्चा होती.परंतु Jr. NTR ने नुकत्याच एका मुलाखतीत तो आणि राम चरण Natu Natu गाण्यावर डान्स करणार नाही याचा खुलासा केलाय त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.पण भारतीयांनी निराश होण्याची काही आवश्यकता नाही. RRR मधल्या Natu Natu गाण्यावर थेट अमेरिकन डान्सर नृत्य करणार आहे. ती म्हणजे लॉरेन गोटिलेब (Lauren Gottlieb). लॉरेन गोटिलेब हि अमेरिकन डान्सर आहे.तिने ABCD, वेलकम टू कराची, घुमकेतू अशा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. लॉरेनने मागे हॉलिवूड असलेला फोटो शेयर करत सर्वांना हि स्पेशल बातमी सांगितली.

लॉरेनने खुलासा केला कि.. "खास बातमी!!! मी OSCARS मध्ये Naatu Naatu वर परफॉर्म करत आहे!!!!!! जगातील सर्वात प्रतिष्ठित मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मला शुभेच्छा द्या!!!"लॉरेनच्या पोस्टवर एकाने कमेंट केलीय कि, "तुझा खूप अभिमान आहे आम्हाला." अशाप्रकारे लॉरेनचा डान्स पाहण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे.Jr. NTR म्हणाला, "मला वाटत नाही की असे काही घडेल. मी ते घडण्याची वाट पाहत होतो. पण, दुर्दैवाने, आम्हाला रिहर्सल करायला वेळ मिळाला नाही. कारण आम्हाला जगातील सर्वात मोठ्या स्टेजवर जाऊन उगाच काहीही नाचायचे नाही.Jr. NTR पुढे म्हणाला, " आम्ही दोघेही व्यस्त होतो. कदाचित राम चरण देखील ऑस्करच्या सगळ्या गडबडीत व्यस्त होता. त्यामुळे मला नाही वाटतं आम्ही Natu Natu गाण्यावर डान्स करू.ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल साँग कॅटगिरीमध्ये RRR च्या नाटू नाटू ला नॉमिनेशन मिळाले आहे. ९५ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये नाटू नाटूला मिळालेलं नॉमिनेशन हे समस्त भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने