'जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाहीत'; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

कर्नाटक: कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं (BJP) जोरदार तयारी केली आहे.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  यांनी कर्नाटकातील कनकगिरी आणि कोप्पळ या शहरांमध्ये विजय संकल्प यात्रेदरम्यान काँग्रेसवर निशाणा साधला.कनकगिरीमध्ये हिमंता सरमा म्हणाले, 'जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत राहुल गांधी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. आम्हाला इथं (कर्नाटक) भाजपला सत्तेत आणायचं आहे. आम्हाला आता बाबरी मस्जिद नकोय, रामजन्मभूमी हवी आहे.'राहुल गांधींनी  लंडनमध्ये भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत तुम्ही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असंही सरमा म्हणाले.सरमा पुढं म्हणाले, 'आम्हाला कर्नाटकात भाजपचं सरकार आणायचं आहे. ही विधानसभा निवडणूक आमच्यासाठी सेमीफायनल आहे. अंतिम फेरीत लढून नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत ‘अमृत काल’मध्ये विश्वगुरू बनेल.'पीएम मोदी कर्नाटक आणि भारताच्या विकासावर काम करत आहेत. ते लंडन किंवा अमेरिकेला गेले की आपल्या देशाचं गुणगान करतात, पण राहुल गांधी लंडनला गेल्यावर आपल्या संसदेला शिव्या घालतात, अशी टीकाही त्यांनी राहुल गांधींवर केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने