कियारा पाठोपाठ 'ही' अभिनेत्री अडकली लग्नबंधनात? प्रसिद्ध सिंगरसोबत गुपचुप उरकलं?

मुंबई: टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम जस्मिन भसीन ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची फॅन फॉलविंगही चांगलीच आहे. बिग बॉसनंतर तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली. ती अनेकदा नवीन म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसते. जास्मिन भसीन पंजाबी चित्रपटांमध्येही काम करत आहे. तिचे चित्रपट आणि गाणी प्रेक्षकांतीस उतरतात. मात्र जस्मिन तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते.ती गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अली गोनीला डेट करत आहे. या दोघांची जोडी बिग बॉसच्या घरात जमली. तिथेच त्याचे प्रेम बहरले. बाहेर आल्यावरही अनेकदा त्यांना सोबत स्पॉट केलं जातं.मात्र आता या दोघांमध्ये काही तरी खटकलं असल्याचं दिसतयं. जास्मिनने अली गोनीची फसवणूक करून दुसऱ्याशी लग्न केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्री नेहा कक्करचा भाऊ आणि गायक टोनी कक्करसोबत तिनं लग्न केलं असल्याचा दावा करण्यात येत आहे.या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ स्वतः टोनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. नेटकऱ्यांच्या या व्हिडिओला जोरदार कमेंटही येत आहेत. नेटकऱ्यांनी तर थेट जास्मीनवर निशाणा साधत तिला ट्रोलही केलंय. तिनं अलीला फसवल्याचा आरोप त्यांनी जास्मीनवर केलाय.मात्र हा व्हिडिओ खरा नाही. खरतर टोनी आणि जास्मिन भसीन लवकरच नवीन म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत.ज्यात दोघांच्या लग्नाचा सीन दाखवण्यात येणार आहे. जास्मिन आणि टोनी या गाण्यासाठी शूटिंग करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत टोनीने कॅप्शनमध्ये लिहिले, लग्न केलं. या व्हिडिओमध्ये वधू जस्मिन भसीन खूपच सुंदर दिसत आहे.या व्हिडिओवर युजर्स अनेक कमेंट्स करत आहेत. अलीची फसवणूक करून जास्मिन भसीनने टोनीशी लग्न केल्याचं अनेकांना वाटत असलं तरी हा फक्त एक शूटिंग व्हिडिओ आहे. यात काही तथ्य नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने