लंडनला पोहचताच राहुल गांधींमध्ये झाला मोठा बदल; नवा लूक व्हायरल

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ट्रेंडिंगवर आहेत. लंडनला पोहचताच राहुल गांधींमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यांचा नवा लुक सध्या चर्चेत आला आहे. राहुल गांधी सात दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. दरम्यान त्यांनी स्वतःमध्ये बदल केला आहे.केंब्रिजला पोहोचल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा तब्बल 6 महिन्यांनंतर ते दाढी सेट केलेले दिसले. राहुल गांधीच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. यात्रेत पांढरी दाढीसह कडाक्याच्या थंडीतील त्यांचा व्हाईट टी-शर्ट लूक चर्चेत राहिला होता. अशातच सध्या राहुल गांधींचा जेंटलमन लूक व्हायरल होताना दिसत आहे.राहुल गांधींचा एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी दाढी ट्रिम केल्याचं पाहायला मिळत आहे.केंब्रिज जज स्कूलने आपल्या ट्विटर हँडलवर राहुल यांच्या भेटीचा आणि त्यांच्या भाषणाचा विषय शेअर केला आहे. राहुल बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत भारत जोडो यात्रेचे अनुभव शेअर करणार आहेत. त्यांचा विषय लर्निंग टू लिसन इन द 21st सेंच्युरी असा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने